आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध:पेढा व खवा व्यवसायासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध; राष्ट्रीयकृत बँकेसाठी पाथरूड ग्रामपंचायतीचा ठराव सादर

पाथरूड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथरूड पेढा व खवा व्यवसायासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे दहा टन खवा व पेढ्याची उलढाल पाथरूड येथे होते. परंतु या उलाढाल करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे व्यापाऱ्यांची व नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे पाथरूड येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एक शाखा आहे.या शाखेमध्ये ३५ हजार ग्राहक आहेत.

त्याच्यामुळे बँकेमध्ये नेहमी गर्दी असते. गर्दीमुळे ग्राहकांना सुरळीत सेवा मिळत नाही. त्यामुळे पाथरूड येथे राष्ट्रीयकृत बँक असावी यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने ठराव घेतला आहे. या ठरावाची प्रत भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या व पाथरूड ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना सादर करण्यात आली.

ठरावाचे पत्र मंत्री महोदयांना भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर, बूथ प्रमुख गजेंद्र धर्माधिकारी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कुटे,उत्कर्ष देशमुख, सचिन मस्के ,सचिन बारगजे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. मंत्रीमहोदयांनी लवकरच बँक सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. ठराव मंजुरीसाठी उपसरपंच तानाजी बोराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...