आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळपासूनच निघणार मिरवणुका:आज बाप्पांना निरोप; रोडवरील खड्डे बुजवले, पथदिवेही लखलखले, सादरीकरणाची तयारी

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाला आज निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी उस्मानाबाद नगरपरिषदेसह जिल्हा पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. विसर्जन व्यवस्था करण्यासाठी दोन्ही यंत्रणांची चांगलीच दमछाक झाली आहे. पोलिसांना जिल्हाभरात तर नगर परिषदेला शहरातील व्यवस्था करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करावे लागले. सकाळी ११ ते रात्री पर्यंत विसर्जन करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. तसेच विसर्जन मार्गावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

शहरातील मुख्य चार मार्गावरून विसर्जन करण्यात येते. त्या रस्त्यावर नगर परिषदेकडून मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आहेत. तसेच या मार्गावरील पथ दिव्यांची दुरुस्ती करुन सर्व दिवे सुरु करण्यात आले आहेत. विसर्जन स्थळांसह मार्गावर मुख्य चौकात पोलिस आणि नगर परिषदेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याच बरोबर मिरवणूक मार्गावर अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या कापण्यात आल्या आहेत.

त्यामुळे विसर्जन मार्गावर कोणत्याही अडचणी येणार नाही. तसेच हातलाई देवी तलाव आणि समता नगर मधील विसर्जन विहिरीजवळ साफसफाई करुन तेथे वीज पुरवठा करुन तेथे लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर तलाव आणि विसर्जन विहिरीजवळ पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार असून शहरातील मुख्य चौकात त्यांचे पथक राहणार आहे. त्याच बरोबर मिरवणुकीतही पोलिस उपस्थित राहणार आहे. शहरातील विसर्जन मार्गावर प्रवासी आणि शहरातील वाहनांमुळे कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी वाहनांसाठी मार्ग बदलले आहेत.

या मार्गात करण्यात आले बदल
शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून ते शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत औरंगाबाद, सोलापूर, लातूर,बीड, हैदराबादहून येणाऱ्या वाहनांना शहरात बायपास सांजा चौकमार्गे प्रवेश. बार्शी, पुणे, करमाळा, परंड्याहून येणाऱ्या वाहनांना जिजाऊ चौक, माणिक चौक मार्गे मार्गे मध्यवर्ती इमारत चौकातून बस स्थानकाकडे सोडण्यात येणार आहे. परतीचा मार्गही असाच असणार आहे.

डेसीबल मोजणार
शहरातील मुख्य चौकात पोलिसांचे पथक राहणार आहे. साऊंड सिस्टिम असल्यास आवाज नियंत्रणात ठेवावा. पोलिआवाजाची तपासणी करणार आहोत. त्यामुळे मंडळांनी काळजी घ्यावी.
तानाजी दराडे, पोलिस निरीक्षक, आनंदनगर पोलिस ठाणे.

शनिवारीही निर्माल्य उचलणार
नगर परिषदेच्या वतीने रस्ते सफाईसह पथदिवे, खड्डे बुजवण्याचे कामे पूर्ण केले. कर्मचारी अधिकाऱ्यांचा फौजफाटा नियुक्त केला. निर्माल्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली. अधिकचे निर्माल्य व सफाई शनिवारी पुन्हा करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नगर परिषदेकडून विसर्जनाची तयारी करण्यात येत आहेत.
हरिकल्याण येलगट्टे, नगर परिषद मुख्याधिकारी.

बातम्या आणखी आहेत...