आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध स्पर्धांचे आयोजन:परंडा आणि नळदुर्गमध्ये गणरायाला भक्तिपूर्ण वातावरणामध्ये निरोप

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मानाच्या हंसराज गणेश मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यासह, भावगीत भक्तीगीत मैफली, आबदागीरी, घोडे व बँड पथकासह मोठ्या उत्साहात गुरुवार (दि.८) सायंकाळी ६ वाजता शहरातील मुख्य मार्गावरुन वरुन राज्याच्या उपस्थितीत भव्य दिव्य मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्याची उधळण करीत काढण्यात आली.

शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या मानाच्या गणपती महाआरती माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर महिलांनी १००१ मोदकाचा प्रसाद यावेळी वाटप करण्यात आला. त्यानंतर श्री ची भव्य विसर्जन मिरवणूक पारंपारिक बँडपथक, घोडे, सवाद्यासह भव्य दिव्य अशी “श्री” ची विसर्जन मिरवणूक पाहण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी नगसेवक मकरंद जोशी, अध्यक्ष अमित जोशी, उपाध्यक्ष शुभम भातलंवडे, राहुल देवळे, नितीन भोत्रेकर, हरीभाऊ जोशी, अनंत केसकर डॉ.प्रशांत गोफणे, ॲड.श्रीकांत भालेराव, प्रमोद वेदपाठक, हरीभाऊ जोशी, जयंत भातलवंडे,समर्थ कुलधर्मे, शुभम भातलवंडे अमोल जोशी, रोहीत मुगळीकर, संदीप महामुनी, अमोल भराटे, राहुल मुगळीकर, पिनु जोशी, सुमीत भातलंवडे आदीसह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हंसराज गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये रक्तदान शिबीर, बुध्दीबळ स्पर्धा, मोदक स्पर्धा, कोरोना प्रतिबंधक दुसरा व बुस्टर ढोस शिबीर, शाहीर शरद नवले यांचा पोवाडा आदी कार्यक्रम राबवले. तसेच पारंपारिक वाद्य,बँड पथकाने नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले होते नागरिकांनी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती.

नळदुर्गमध्ये विसर्जन
मोठ्या उत्साहात नळदुर्ग पोलीस ठाण्याचा जयहिंद गणेश मंडळ व व्यापारी गणेश मंडळाच्या गणरायाला बुधवारी निरोप देण्यात आला.सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद गणेश मंडळाने असा ऐतिहासिक गणेशोत्सव यावर्षी साजरा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील व प्रतापसिंह भोरे -पाटील यांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. व्यापारी मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस मराठा गल्ली येथुन प्रारंभ झाला. पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते महाआरती झाली.

बातम्या आणखी आहेत...