आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिसर्गावर अवलंबून असणारी शेती हा जोखमीचा धंदा झाला आहे. त्यात डिझेलसह इतर साहित्याच्या दरवाढीमुळे परिणाम झाला असून ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या मशागतीचे दर वाढले आहेत. खते व बियाण्यांच्या दरातही वाढ झाली आहे. मजुरीचे दरही वाढले आहेत.
शेतकऱ्यांना एकीकडे महागाईचा फटका बसत असताना सोयाबीन, हरभरा, कांदा पिकाच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी बाजुंनी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्नाची हमी व शेतमालास योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामासाठी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षी मशागतीसाठी डिझेलचा दर ७५ रुपये होता. यावर्षी डिझेलने शंभरी पार केली. यामुळे मशागतीच्या दरात एकरी ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली. त्यात भर म्हणून खते, बियाण्यांच्या दरातही वाढ झाली आहे. परंतु शेतमालाच्या किंमतीत चांगलीच घसरण झाली आहे. उन्हाळी कांदा कवडीमोल दरात विकला जात आहे. सोयाबीन, हरभरा पिकाच्या दरातही घसरण झाली आहे. शेतमाल १५ दिवसांपूर्वी व सध्याचे दर- सोयाबीन - ७३००, ६७०० रुपये, हरभरा ४५००- ४७०० ४२०० -४३००, कांदा - १५-२२ रू किलो २ ते ६ रुपयांपर्यंत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.