आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा चढला:उस्मानाबादच्या हासेगावमधील शेतकऱ्याचा उष्माघाताने घेतला बळी, उष्माघाताचा जिल्ह्यातील पहिला मृत्यू

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाच्या तीव्रतेने अंगाची लाही लाही होत असून सुर्य आग ओकू लागल्याने घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यातच उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यातील हासेगाव केज येथील लिंबराज तुकाराम सुकाळे या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. हा उष्माघाताचा जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे. दरम्यान राज्यात उष्माघाताचा हा तिसरा बळी ठरला आहे. या आधी दोन जणांचा बळी गेला आहे.

जिल्ह्यातील कळंब तालुक्याला अती उष्णतेमुळे प्रशासनाने खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. सध्या उस्मानाबाद जिल्हयात सुर्य आग ओकू लागल्याने उन्हाने जीव लाहि लाहि होत असुन उष्णतेचा पारा 40 पार गेला आहे. या मुळे घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे. लिंबराज सुकाळे हे दुपारपर्यंत शेतातील कामे करत होते. त्या नंतर तहान लागल्याने ते पाणी प्यायला गेले. त्याच वेळी त्यांनी उष्माघाताचा झटका बसला आणी जागेवरच ते कोसळले. रुग्णालयातील डॉ. बालाजी आदमपुरकर यांनी प्राथमिक तपासणी केली असता, सुकाळे यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पण कोणत्या कारणाने मृत्यू झाला हे स्पष्ट झाले नव्हते, त्यानंतर पाच वाजेच्या दरम्यान शवविच्छेदननंतर त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे स्पष्ट झाले. अशी माहिती डॉ. पुरुषोत्तम पाटील यांनी दिली.

काय आहेत उष्मपाताची लक्षणे
चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी येणे ही उष्माघातीची लक्षणे आहेत. म्हणजे प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरिक तापमान. घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते, रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, शरीरात ताठरता येते, हात आणि पायात आकडी येतात, मानसिक बदल होतो, चिडचिड होते, भ्रम होतो आणि कोमा म्हणजेच बेशुद्धवस्था येते आणि मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. हे असे क्रमाक्रमाने होते, बेशुद्धवस्था हा वयस्कांमध्ये उष्माघातचा पहिला संकेत असू शकतो.

उष्माघातावर हे आहेत प्रथमोपचार
शरीरातली जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. शरीराला ओल्या कापडाने पुसून काढावे. त्याच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी. बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक देण्यास सुरुवात करावी. कारण या जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो व थंडाव्यामुळे शरीराचे उष्णतामान कमी व्हायला मदत होते.

उन्हापासून घ्यायची काळजी
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते तेव्हा शक्यतोवर उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास काही गोष्टी पाळल्यास उन्हाचा त्रास कमी होऊ शकतो. शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नका. सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा कामांची विभागणी करा. अगदीच आवश्यक असेल सौम्यरंगांचे आणि ढिले कपडे वापरावे. टाइट जीन्स आणि भडक कपडे वापरणे टाळावे. टोपी, कानाला आणि डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधवा, छत्रीचा वापर करावा. जवळ पाण्याची बाटली ठेवावी. गरजेप्रमाणे मधून मधून पाणी प्यावे. तापमानवाढीबरोबरच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. तहान लागण्याची वाट न पाहता दररोज 8 ते 10 ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे.

बातम्या आणखी आहेत...