आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:शेतकरी वैतागले, उसाचे गाळप करण्यासाठी धरणे

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पश्चाताप होत असल्यासारखी परिस्थिती आहे. उसाचे गाळप होत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तातडीने उसाचे गाळप करण्याच्या मागणीसाठी बळीराजा पार्टीच्या वतीने सोमवारी शेतकऱ्यांसमवेत धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी कारखान्यांचे सभासद असून देखील त्यांचा ऊस कारखान्याने नेलेला नाही. मात्र, कारखाने बाहेरून ऊस आणून त्याचे गाळप करीत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. येत्या १० दिवसांत या कारखान्याने आपापल्या क्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांचा ऊस प्राधान्याने नेवून गाळप करावे. तसेच जे शेतकरी कारखान्याचे सभासद व नोंद असताना देखील महिन्याच्या पुढे प्रोग्राम येऊन देखील ऊस तोडणी करीत नाहीत. या शेतकऱ्यांचे संबंधित कारखान्याने नुकसान भरपाई देण्याचे आदेश काढण्यात यावेत आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तात्या रोडे, जिल्हा महासचिव महादेव कांबळे, कळंब तालुकाध्यक्ष कल्याण तवले पाटील, बिभीषण कदम, एल.जी. शेख, राजेंद्र गायकवाड, हरिदास जाधव, राजकुमार देवकर व मोहन कदम आदी सहभागी झाले होते.

७५ टक्के उस परजिल्ह्यातील
बळीराजा पार्टीच्या वतीने येरमाळा चौरस्त्यात १ तास उभे राहून चौकशी केली असता जवळपास ७५ टक्के ऊस बीड, माजलगाव, गेवराई, केज व धारूर या भागातून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच एकरी ५ हजार रुपये ऊस तोडणीसाठी व ड्रायव्हर भत्ता म्हणून १ हजार रुपये प्रती ट्रीप घेतले जात आहेत. कारखाना एरिया बाहेर आहे म्हणून १९०० रुपये प्रती टन ऊस खरेदी करीत आहेत. त्यावर शासनाचे नियंत्रण नाही.

बातम्या आणखी आहेत...