आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी चिंताग्रस्त:सोयाबीनला योग्य भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंताग्रस्त दिसत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेतातच कोंब फुटले होते. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाने कहर केला. यामुळे काही शेतकऱ्यांचे सोयाबीन काळसर पडले तर काही शेतकऱ्यांचे कापणी केलेले सोयाबीन शेतातच पडून राहिल्याने जागेवरच कोंब फुटले होते.

शेतकऱ्यांना महागाईच्या काळात सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. तालुक्यात यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या पेरणीला पहिली पसंती देत अधिकचा पेरा केला. तालुक्यात जुनच्या शेवटी हजेरी लावल्यामुळे पेरणी एक महिना उशीर झाली. उशीरा पेरणी करूनही सोयाबीन चांगले आले होते. परंतु, सततचा पाऊस तर ऑगस्ट महिन्यात १६ दिवस उघडीप दिल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. तरीही तालुक्यातील शेतकरी डगमगला नाही.

सोयाबीनला महागड्या औषधाची फवारणी करत सोयाबीनची जपणूक केली. परंतु, ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने सोयाबीनचे पुन्हा नुकसान झाले. गतवर्षीपेक्षा यावर्षी शेतकऱ्यांचे दोन तीन वेळा नुकसान झाले. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी संकटावर मात केली. परंतु, उरला सुरल्या सोयाबीनला मात्र कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला साडेचार हजार ते पाच हजार या दरम्यान दर दिला जात आहे. यामध्ये कडती घेतली जात आहे. आर्थीक नुकसान भरून काढण्यासाठी सोयाबीनला योग्य भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

७ हजार हमीभाव द्या
सोयाबीनवर केलेला खर्चही निघत नाही. अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सोयाबीनला एक क्विंटलला ७ हजार रुपये हमीभाव द्यावा.-तानाजी पाटील, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष.

योग्य भाव द्या
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळाला तर शेतकरी टिकेल. सततचा पाऊस अन् अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच पुन्हा सोयाबीन खरेदी केंद्रावर पिळवणूक हाेत अाहे. शेती पिकांना योग्य भाव द्यावा.-मोईज सय्यद, युवक काँग्रेस नेते.

बातम्या आणखी आहेत...