आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याचा समावेश:शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे दिले आश्वासन, विनायकरावांचे उपोषण मागे

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा शासनाच्या नुकसान भरपाई मध्ये समावेश करण्याची ग्वाही आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिल्याने शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी मागील चार दिवसांपासून सुरू केलेले उपोषण शनिवारी मागे घेतले.

अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊनही विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्ह्याचा समावेश केला नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी पाटील यांनी कवठा येथील सेवाग्राम येथे ३१ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाला राजकीय पक्षांसह शेतकरी, सामाजिक संस्थांचा वाढता पाठींबा मिळाला होता. उपोषणादरम्यान पाटील यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी (दि.३) आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मध्यस्थी केली. दसऱ्या अगोदर अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे पाठवणार असे सांगत आमदार चौगुले यांनी दिली. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालय व शासनाने शेतकऱ्यांना दसरा सणाच्या आत भरपाई दिली नाही तर सरकारचा दसरा मेळावा होऊ देणार नाही, असा इशारा विनायकराव पाटील यांनी यावेळी दिला. उपस्थित बालकाच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, प्रभारी तहसीलदार रतन काजळे, विजयकुमार सोनवणे, नानाराव सोनवणे, व्यंकट सोनवणे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाहुराज माने, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, माजी सरपंच गणेश पाटील, कवठा ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...