आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:शेतकऱ्यांकडून कारहुणवी सण उत्साहात साजरा, गावातून बैलजोड्यांची मिरवणूक

उमरगा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीत वर्षभर मशागतीच्या कामाचे ओझे पेलणाऱ्या बैलजोड्यांचे दरवर्षी विधिवत पूजन करुन शेतकरी कारहुणवी सण साजरा करतात. यावर्षी उमरगा तालुक्यात मंगळवारी (दि.१३) कारहुणवीनिमित्त सीमावर्ती भागात बैलजोड्यांचे पूजन करुन गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उमरगा तालुका हा कर्नाटकाच्या सीमेलगत असल्याने शहरासह तालुक्यातील अनेक गावात कारहुनवी सण साजरा केला जातो. उर्वरित गावांमध्ये बैलपोळा सण साजरा करण्यात येतो. कर्नाटकी बेंदुर म्हणून प्रचलित कारहुणवी सण महाराष्ट्रातील काही भागात साजरा केला जातो. अविरतपणे काळ्या आईटी मेहनतीची सर्व कामे करणाऱ्या बैलजोडीला या सणाच्या दिवशी बहुमान मिळतो.

बदलत्या काळानुरूप शेती व्यवसायात बदल होत असून आधुनिक तंत्रज्ञानाने शेती व्यवसाय सुरू झाल्याने बैलांनी शेती कसण्याचे कमी झाले तरी बैलांशिवाय शेतीची कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. या कारहुणवी सणानिमित्त शेतकरी मागील दोन दिवसांपासून तयारी करत होते. यंदा पावसाने अद्याप सुरुवात केली नाही. त्यामुळे सणानिमित्त शेतकरी सकाळी पशुधनास आंघोळ घालून त्यानंतर बैलांना सजवण्याच्या कामात मश्गुल झाले होते.

बैलांच्या शिंगांना रंग लावणे, रंगीबेरंगी सजावट, घागर माळे, मटाट्या, मोरकी आदी आभूषणे घालून सजवल्यावर बळीराजाने पशुधनाची सहकुटुंब पूजा केली. त्यानंतर गावातील मंदिरापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील बेडगा, डिग्गी, गुंजोटी, चिंचोली (जहागीर), पारसखेडा, भुसणी, मळगी, मळगीवाडी, कोथळी, कंटेकुर, कदेर, मुरुम, भुयार चिंचोली, येणेगूर, जकेकुर, भोसगा, शहरासह परिसरात तर कर्नाटक सीमेजवळील उजळंब, एकंबा, आणुर, गदलेगाव, रामतीर्थ, लाडवंती परिसरात कारहुणवी सण उत्साहात साजरा झाला. जकेकुरवाडीत कारहुणवीनिमित्त बैलजोड्यांची मिरवणूक

तालुक्यातील जकेकुरवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंगळवारी (दि.१४) ज्येष्ठ महिन्यातील पहिला उत्सव पौर्णिमेनिमित्त गावातील सर्व बैलजोड्या व पशुधनांचे विधिवत पूजन करून साजरा करण्यात आला. संयुक्त बैलजोड्यांची सवाद्य मिरवणूक काढून गावातील देव-देवतांचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून सण उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पशुपालक, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. कारहुणवी सणानिमित्त तालुक्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

कदेर येथे कारहुणवीनिमित्त विविध उपक्रम
उमरगा तालुक्यातील कदेर गावात १२ महिने शेतीची कामे करणाऱ्या पशुधनाची शेतकऱ्यांनी मनोभावे पूजा केली. मंगळवारी (दि.१४) सकाळी ९ वाजता रमेश बप्पा देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य मार्गावरून पशुधनाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी तीन वाजता गावातील सर्व बैलजोडया, काठी व दांडपट्टा फिरवणे व शोभेचा मल्लखांब खेळणे, मल्लखांबासोबत सोंगडया, छातीवर दगडी शिळ फोडणे आदींचे सादरीकरण करण्यात आले. अशी कारहुणवीची सांगता करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...