आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शेतकऱ्यांनी केला आ. चौगुले यांचा सत्कार

लोहारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लोहारा खु. येथील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या कारभारी वस्ती ते नागुर रस्त्यावर (लोहारा खु.) गावाजवळील द्वारका नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी शनिवारी (दि.१७) आमदार ज्ञानराज चौगुले यांचा सत्कार केला. परिसरातील गावांमधील नागरिक व शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी अडचण येत आहे. द्वारका नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची या परिसरातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

या कामासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सतत पाठपुरावा करुन नाबार्ड टप्पा- २८ अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. याबाबत नुकताच मंजुरी आदेश निघाला आहे. याबद्दल शनिवारी (दि. १८) लोहारा खु. येथील शेतकऱ्यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी लोहारा खुर्दचे सरपंच सचिन रसाळ यांच्यासह व्यंकट रसाळ, महादेव आरगडे, मदन लोखंडे, दत्ता सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, अजय रसाळ, हणमंत सूर्यवंशी, सतीश रसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...