आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र असून त्यात कोरडवाहू क्षेत्र अधिक आहे. यंदा अवकाळी पाऊस सुरूच असल्याने पेरणीपूर्व मशागतीला विलंब झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे जेमतेम उत्पन्न निघाले. त्यात विमा कंपनीने हवालदिल केल्याने शेतकरी असमाधानी दिसून येत आहे. मृग नक्षत्र सुरूवात होण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने पाऊस होण्यापूर्वी शेतीतील कामे पूर्ण करत पेरणीसाठी शेतजमीन तयार ठेवण्याच्या कामात शेतकरी गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या शेतात धसकटे काढणे, शेणखत टाकणे, औत मारणे, नांगरणी आदी कामे सुरू आहेत. निसर्गाच्या आशेवर वर्षाचे आर्थिक अंदाज बांधत नियोजन करणारा शेतकरी यंदा तरी भरघोस उत्पन्न निघेल, या भ्रामक आशेवर पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेण्याच्या घाईत आहेत. सर्वकाही सुखकर होइल, असूनही
अाशा साेडली नाही
गतवर्षी सोयाबीनचे चांगले उत्पन्न निघाले, परंतु अर्धा माल अद्याप विकला गेला नाही. जो विकला त्याचे पैसे गतवर्षीचे देणे देण्यातच गेले. आता पुन्हा उसनवारी करण्याची वेळ आली आहे. चांगल्या उत्पन्नाच्या आशेने पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू केली आहेत.
- तात्याराव भोसले, शेतकरी.
काढलेलं कर्ज, उसनवारी निघालेल्या उत्पन्नावर फेडता येईल, या आशेने मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. खरीप हंगाम सुरू होणार असल्याने आर्थिक चणचण असतानाही उसनवारी करत काळ्या आईची ओटी भरणे गरजेचे असल्यामुळे तयारी करावी लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सध्या अवकाळी पावसाने उघाड दिली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शिवार रिकामे झाले असून शेतकरी शेतातील बांध बंदिस्ती, धसकट वेचणे, शेणखत टाकणे, नांगरणी, कुळव, जमीन सपाटीकरण, मोगडणी, बांधावर मुरुम व मातीचा भराव, पालापाचोळा जमा करणे, झाडांची खोडं काढणे आदी कामे जोमाने सुरू आहेत.
मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना स्वतः काम करावी लागत आहे. काही ठिकाणी रब्बी हंगामातील उशीरा पेरा झालेल्या पिकांच्या काढणीची कामे सुरू आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून लवकरच येण्याची शक्यता गृहीत धरून तालुक्यातील बि-बियाणे व खते विक्रेत्यांनी विविध कंपनीचे खते व बियाण्यांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभाग सज्ज झाला असून बि-बियाणे व खत विक्रेत्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.