आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगामातील पीक विमा:ईट मंडळामधील शेतकरी नुकसान भरपाई अनुदान मिळण्याच्या प्रतिक्षेत

ईट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसाने व सततच्या पावसामुळे खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानीची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली.त्यामधील अनेक ठिकाणी त्याचे वाटही सुरू झाले आहे.तसेच भूम तालुक्यातील तीन मंडळानेही मदत आली आहे .मात्र ईट महसूल मंडळ यातून वगळण्यात आले आहे.या मंडळातील शेतकरी या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.तसेच खरिप हंगामातील पीक विमाही मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.शासनाच्या व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्ष्य मुळे शेतकऱ्यांना मातीपासून वंचित राहावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

ईट महसूल मंडळात सुमारे १३ हजार हेक्टर वर खरि हंगामातील पिकाची पेरणी झाली होती.ईट महसुल मंडळात सततच्या होणारया पावसामुळे शेतीचे व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या सततच्या होणाऱ्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला.यामुळे शेतकरी वर्ग पुरता संकटात सापडला.पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेक ठिकाणी घेताना तळ्याचे स्वरूप आले होते. यामुळे पिकाचे मोठ नुकसान झाले.मात्र हे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मदती पासून वंचित राहावे लागत आहे.तसेच पीक विमाही अजून मिळाला नाही.या दोन्हीची शेतकऱ्यांना अजून एक दमडी ही मिळाली नाही.यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ईटसह परिसरातील पखरूड,आंद्रूड, लांजेश्वर,डोकेवाडी,गिरवली,जोतीबाचीवाडी,निपाणी,माळेवाडी,नागेवाडी आदी गावामध्ये आॅगस्ट- सप्टेबर या महिन्यात परतीच्या पावलानी पुरता धुमाकूळ घातला.यामुळे खरि हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भूम तालुक्यातील तीन मंडळानेही ३८ कोटी रूपये मदत देण्यात आली आहे. यातून ईट महसूल मंडळास वगळण्यात आले आहे.ईट महसूल मंडळ हे सततच्या पावसामध्ये असल्यामुळे ही मदत मिळाली नाही.जे अनुदान आले आहे.ते अनुदान अतिवृष्टी झालेल्या गावांना आले आहे.हे बोलले जात आहे.या अनुदान पासून ईट महसुल मंडळातील हजोरो शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होउन हरि वंचित रहावे लागत आहे.

त्यामुळे या वगळण्यात आलेल्या ईट मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत कधी मिळणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.तसेच खरि हंगामातील हक्काचा असलेला शेतकऱ्यांचा पीक विमा तोही अजून मिळू शकला नाही.ईटमध्ये महसुल पेरणी क्षेत्र १५ हजार ६९० हेक्टर तर पेरणी झालेले क्षेत्र १२ हजार ६३० हेक्टर आहे. तर सततच्या पावसामुळे नुकसान झालेले क्षेत्र १० हजार ७०७ हेक्टर आहे.

नुकसान भरपाईचा पूर्ण अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला पखरूड येथील शरद चव्हाण म्हणाले की, ईट सहज परिसरात सततच्या झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकरयांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला .प्रशासनाने गंभीर दखल घेऊन इतरांप्रमाणे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मदत देण्यात यावी.निपाणीचे शेतकरी संदिपान कोकाटे म्हणाले की, अजूनही ईट परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.त्याबरोबर खरि हंगामातील पिक विमा या मंडळातील शेतकऱ्यांना मिळाला नाही.शासनाने नुकसान अनुदान व पीक विमा हे दोन्ही लवकरच द्यावे.मंडल अधिकारी ए.आर.आटुळे म्हणाले की, ईट मंडळात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसान भरपाईचा पुर्ण अहवाल हा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.त्यासाठी मदत येतच शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...