आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:तालुका कृषी अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांची फरफट; संपर्कात असणाऱ्या नागरिकांनाच होतोय बियाणे व खतांचा लाभ

भूम24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांची फरफट होत आहे . तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. याच दुष्काळी तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन प्रगती व्हावी यासाठी शासन तालुका कृषि कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे.

या विविध योजना तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी यांच्या सह मंडळ कृषी अधिकारी, सुपरवायझर व कृषी साहायक यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील ९६ गावासाठी तालुका कृषी अधिकारी आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायकांना चार किंवा पाच गावांचे कार्यक्षेत्र नेमून देण्यात आले आहे. परंतु या दुष्काळ ग्रस्त तालुक्याचा कृषि कार्यालयाचा कारभार हाकताना कृषि अधिकारीच हे मुख्यालयी राहत नसतील तर कशी होणार शेतकऱ्यांची उन्नती आणि कसे होणार? तालुका कृषि अधिकारी गायकवाड यांचा कारभार मुख्यालयी न राहता ते बार्शी, उस्मानाबाद या ठिकाणी राहून कारभार हाकतात. तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणी, बी -बियाणे, खते या संदर्भात योग्य मार्गदर्शन करणे, शेती विषयक विविध कार्यक्रम घेणे आवश्यक असताना कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी काही करत आहे असे घडताना अजिबात दिसत नाही.

काही नागरिक कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात तेवढयांनाच बियाणे औषधे देऊन टाकतात. ते वाटप करताना कुठलाही निकष , नियम लावून वाटप करत नसल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद विवाद बऱ्याच वेळा निर्माण होताना दिसतात. तालुक्यातील मोजक्याच नेते मंडळीचे मात्र फोनवरून कामे करतात. त्यामुळे नेतेही यांच्या विरोधात कधी आवाज उठवत नाही.

सर्व सामान्य शेतकरी, नागरिकांना नेहमी नियम दाखविणारे कृषि अधिकारी स्वताः मात्र कुठलेच नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. या सर्व कार्य पध्दतीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची फरफट होऊन प्रगती होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.तालुक्यात कृषि कार्यालयाच्या कामा बाबत शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील मोजक्या नेतेमंडळींची कामे होतात फोनवर तालुका कृषी अधिकारी हे मुख्यालयी न राहता ते इतर ठिकाणी राहून कागदी मेळ घालत आहेत. त्यांना तालुक्यातील शेती, शेतकरी या बद्दल काहीच नाही. शेतकऱ्यासाठी कृषी अधिकाऱ्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. परंतु कृषी अधिकारी हे कधीच मुख्यालयाच्या ठिकाणी थांबून गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळत नसल्याने त्यांचा उपयोग कोणाला होतोय हा प्रश्न शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. सध्या पेरणीपुर्व मशागतीचे दिवस असून महिनाभरात बी- बियाणे काही गावासाठी अनुदानावर येते परंतु हे अधिकारी एखादया गावच्या व्यक्तीकडे ते हवाली करून टाकतात व त्यांच्या मर्जी प्रमाणे वाटप करतात किंवा काळाबाजाराचा रस्ता दाखवितात.

बातम्या आणखी आहेत...