आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा:शेतकऱ्यांना मिळणार‎ सरासरी नुकसान भरपाई‎

धाराशिव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ खरीप २०२२ मधील पंचनामे न‎ झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान‎ भरपाई मिळणार आहे. त्या‎ मंडळातील नुकसानीची सरासरी‎ काढून त्या प्रमाणे विमा देण्याचे‎ विमा कंपनीने मान्य केले. केंद्र‎ सरकार कडील हप्त्याची रक्कम‎ उपलब्ध होताच, या शेतकऱ्यांना‎ विमा वितरीत करण्यात येणार‎ असल्याची माहिती आमदार‎ राणाजगजितसिंह पाटील यांनी‎ दिली.‎

धाराशिव जिल्हयातील अनेक‎ शेतकरी अजुनही पीक विम्यापासुन‎ वंचित आहे. पंचनाम्याच्या प्रती‎ अद्याप उपलब्ध करुन दिल्या‎ नाहीत. तसेच नुकसान भरपाई मध्ये‎ केलेली ५० टक्के नियमबाह्य कपात‎ व पंचनामे न केलेल्या शेतकऱ्यांच्या‎ नुकसान भरपाई बाबत विमा‎ कंपनीकडून कार्यवाही होत नाही.‎ त्यामुळे मंगळवारी आमदार पाटील‎ यांनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या‎ मुंबई येथील कार्यालयात जाऊन‎ विभागीय व्यवस्थापक शकुंतला‎ शेट्टी यांची भेट घेवून चर्चा केली.‎

बातम्या आणखी आहेत...