आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी उपोषण

उस्मानाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत २०२१-२२ या वित्तीय वर्षातील उस्मानाबाद नगर परिषद कडील मंजुरी विकास कामाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी उस्मानाबाद येथील देवानंद एडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दलित समाजाचे राहणीमान उंचावण्यासाठी व नागरी सुविधा मिळाव्या या हेतुने महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय वस्ती मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी थोर महापुरुष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे योजना चालू केली.

या योजनेमधून दरवर्षी दलित मागासवर्गीय वस्ती मध्ये विविध विकास कामे, मागासवर्गीय स्मशानभूमी विकसीत करणे, सभागृह बांधणे, बाग बगीचा करणे, रस्ते करणे, विद्युत रोशनाई करणे आदी विविध प्रकारची कामे केली जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ मार्च २०२२ रोजी ६ कोटी ६१ लाख ९९ हजार ८९९ रुपयांच्या विविध विकास कामांना प्रशासकिय मंजुरी दिली आहे. या कामाची ई-निविदा प्रक्रिया राबवून कामे करण्याचे आदेश दिले होते. या कामाची २७ जुलै रोजी कामाची निविदा प्रकाशित करून २४ ऑगस्टपर्यंत निविदा भरण्याची वेळ होती. मात्र, कामाच्या निविदा अद्याप उघडण्यात आल्या नाहीत. जाणीवपूर्वक कामे टाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...