आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मंदाकिनी बालाजी घुगे (७६ टक्के दिव्यांग) घरकुल योजनेच्या लाभासाठी काही वर्षांपासून शासनदरबारी प्रयत्न करत आहेत. मात्र, अजूनही घरकुल मिळाले नसल्याने ते अणदूर ग्रामपंचायतीसमोर सोमवारपासून (दि.६) उपोषण सुरू करणार आहे. दरम्यान, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण यांनी २६ जानेवारीपर्यंत घरकुलाचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. यासंबंधी मंदाकिनी घुगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपासून घरकुलासाठी विविध कार्यालयात फेऱ्या मारत आहे.
ग्रामपंचायतीने तीनदा आश्वासन देऊनही उपयोग झाला नाही. यापूर्वी २ जानेवारीला ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसलो असता ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण यांनी २६ जानेवारीपर्यंत प्रस्ताव मंजूर करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु ते फसवे निघाले. त्यामुळे आम्ही सोमवारी (दि.६) सहकुटुंब उपोषणास बसणार आहोत. निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक घरकुल, गटविकास अधिकारी, नळदुर्ग पोलिस ठाणे व अणदूर ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत.
सर्व कागदपत्रांची पूर्तता
अटल घरकुल योजनेंतर्गत बांधकाम कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र हवे आहे. त्यांची अगोदर नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री योजनेतून घुगे यांचा ६५ वा क्रमांक आहे. त्यापैकी १५ मंजूर झाले आहेत. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतूनही प्रस्ताव दाखल केला. तसेच जागा नसल्यास त्यांना पंडित दिनदयाळ योजनेंतर्गत ५० हजार रुपयांचे अनुदान, जागा खरेदीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. कागदपत्रांची पूर्तता केली असून मंजुरी जिल्हा स्तरावरुन मिळणार आहे. - देविदास चव्हाण, ग्रामविकास अधिकारी, अणदूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.