आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:भूखंडावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रामा तिम्मा दंडगुले यांना भूखंड क्रमांक बी ८३ हे मंजूर असून अद्याप ते घरापासून वंचित आहेत. कार्यालयाच्या मंजूर यादीप्रमाणे त्यांच्या भूखंडावरील अतिक्रमण काढून द्यावे व भूखंड क्रमांक बी ८३ व ९८च्या मूळ कबालीची नक्कल देण्यात यावी,या मागणीसाठी रामा दंडगुले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपोषण सुरू केले आहे.

जेवळी येथील रामा तिम्मा दंडगुले यांना भूखंड क्रमांक बी ८३ हे मंजूर असल्याचे आपले तहसील कार्यालय सांगत आहे. परंतू सदरील व्यक्ती हा त्या घरापासून वंचित असल्याचे निदर्शनास आणूनही व्यक्तीला न्याय दिला जात नाही.यासाठी लोहारा तहसीलदारांसह जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तालयासमाेर असे अनेक ठिकाणी आंदोलन करून न्याय मिळत नसल्याने उपोषण सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फकीरा ब्रिगेडच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.२ नोव्हेंबरपासून फकीरा ब्रिगेडच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे यांच्यासह दंडगुले परिवार आमरण उपोषण करत आहे.

बातम्या आणखी आहेत...