आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मंदाकिनी बालाजी घुगे या दिव्यांग महिलेने घलकुलासाठी येथील ग्रामपंचायतीसमोर सोमवारपासून (दि.२) सहकुटुंब उपोषण सुरू केले होते. दुपारी तीन वाजता चर्चेअंती ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण यांनी २६ जानेवारीपर्यंत घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
मंदाकिनी घुगे या मागील सात वर्षांपासून घरकुलासाठी अर्ज विनंत्या करत होत्या, दाद न मिळाल्याने त्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले होते. पती बालाजी, मुलगा करण व मुलगी अर्चना हिच्यासह त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यांचा सहा वर्षीय मुलगा मल्हारचीही हजेरी होती. दरम्यान, सरपंच रामचंद्र आलुरे व ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण यांनी दुपारी सरपंच रामचंद्र आलुरे व ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले.
दुपारी तीन वाजता ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी आपणास खास बाब म्हणून अटल बांधकाम कामगार योजने अंतर्गत आपण बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध करून त्या आधारे दि.२६ जानेवारी पर्यंत घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मुलन संघाचे जिल्हा अध्यक्ष पंडीत जळकोटे, प्रहार संघटनेचे उपतालुका प्रमुख अनील महाबोले, सुभाष काळे आदी उपस्थित होते.दलीत पँथरचे मिलींद गायकवाड यांनी या उपोषणास पाठींबा दिला होता. लेखी आश्वासन मिळाल्याने तुर्तास आज उपोषण मागे घेत आहोत मात्र टाळाटाळ केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचे बालाजी घुगे यांनी यावेळी सांगितले. हेच लेखी आश्वासन किंवा जाणीवपूर्वक प्रयत्न झाले असते तर दिव्यांग महिलेसह त्यांच्या कुटूंबाची इतकी फरफट झाली नसती अशी चर्चा उपोषणस्थळी चालु होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.