आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बामणी येथील २७ वर्षीय युवकाने कोरोनाच्या भीतीने सोमवारी रात्री उस्मानाबाद शहरातील तुळजाभवानी स्टेडियमच्या दक्षिण बाजूच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, सोमवारी रात्री त्या युवकाचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
सुदर्शन सोमनाथ सिरस हा काही दिवसांपूर्वी पुणे येथे गेला होता. परत आल्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्याने आरोग्य सेतू अॅपवर माहिती भरली होती. त्याला कोरोनाची लक्षणे असल्याचे समजले होते.
त्याने २८ फेब्रुवारीला जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केली. तेथील डॉक्टरांशी हुज्जत घालून खासगी डॉक्टरकडे तो गेला होता. मात्र, कोरोना असल्याच्या भीतीने त्याने सोमवारी उशिरा आत्महत्या केली. यादरम्यान, सोमवारी रात्री त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.