आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:आंदोलनाची धास्ती ; हायवेचे काम सुरू

जळकोट6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे महाविकास आघाडीने जिल्ह्यातील पुणे-हैदराबाद रष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शनिवारी (दि.६) रास्ता रोकोचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनापूर्वीच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी गटारीचे काम सुरू केल्याने आंदोलन थगीत केले.

आठ वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. महामार्गावर खड्डे पडून गुडघाभर खड्ड्यात पाणी साचून किरकोळ अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत गटारी, सर्व्हिस रोडचे काम अर्धवट स्थितीत असल्याने स्थानिक महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी शनिवारी (दि.६) रास्ता रोकोचा इशारा दिला होता. मात्र, रास्ता रोको करण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी रमेश काळे, सहायक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे, तलाठी तात्यासाहेब रुपनवर यांनी बैठक घेऊन गटारीचे काम तत्काळ सुरू करून इतर काम दोन दिवसांत सुरू करणार असल्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोक पाटील, शिवसेनेचे कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कदम, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...