आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीनता:उमरग्यात गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर, पावसाळ्याच्या तोंडावर साथरोगांची भीती ; पावसाळ्यापूर्वी गटारी उपसल्याच नाहीत

उमरगा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील गटारी तुंबल्या आहेत. गटारींमधील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.

पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यात हे गटारीचे पाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे महादेव गल्ली भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी दक्षता शहरातील अंतर्गत भागातील रस्ते व गटारींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. गटारी काढणे आवश्यक आहे.

परंतु अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. शहरातील बहुतांश भागात रस्त्यासोबतच गटारी तुंबल्याने अनेक भागात रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. शहरातील महादेव गल्ली भागात गटार तुंबल्याने 0 घाण पाणी रस्त्यावर आल्याने रस्ताच गटारमय झाला आहे. शुक्रवारी (दि. १७) सकाळी शाळेकडे जाणाऱ्या मुला-मुलींना घाण पाण्यातून वाट काढावी लागली. गटारींचे पाणी अधूनमधून रस्त्यावर येत आहे. एकीकडे कोरोना संसर्ग आणि दुसरीकडे पावसाळ्याच्या तोंडावर संसर्गजन्य रोगांची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. शाळेतील विद्यार्थी याच रस्त्यावरुन ये-जा करतात. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याने पावसाचे पाणी त्यात साचते. शहरात अनेक भागात मोठया प्रमाणात वराह, माशा व डासांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध वॉर्ड, प्रभागात अस्वच्छता निर्माण झाली आहे. गटारींचे दुर्गंधीयुक्त पाणी गल्लोगल्ली रस्त्याच्या कडेने साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परतीच्या पावसाने वराह व डासांचे प्रमाणात वाढल्याने डेंग्यूसदृश्य व साथीच्या आजारांची शकता नाकारता येत नाही.

मूलभूत सुविधांचा अभाव ^शहरातील अंतर्गत भागात रस्ते, गटारी नसल्याने, वैयक्तिक, सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याचे डबके साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नगरपालिकेच्या अनेक भागात मूलभूत सोयी-सुविधा पोहचल्या नाहीत. इंदिरा चौकापासून महादेव गल्ली, शिंदे गल्ली भागात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. - दत्ताभाऊ शिंदे, नागरिक.

गटारींचे घाण पाणी तुंबले शहरातील महादेव गल्ली, शिवपुरीरोड, उपजिल्हा रुग्णालय, बालाजीनगर, डिग्गी रोड, मुन्शी प्लॉट, पतंगे रोड, मलंग प्लॉट, भारतनगर, काळे प्लॉट, झोपडपट्टीसह विविध भागात गटारीच्या पाण्याला नाली नसल्याने गटारीचे घाण पाणी तुंबले आहे.

बातम्या आणखी आहेत...