आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल वाचनालयाचे उद्घाटन:दोन शाळांतील २६ गुणवंत शिक्षकांचा सत्कार

कसबे तडवळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे शालेय व्यवस्थापन समितीने शिक्षकदिना निमित्त जगदंबा फंक्शन हाॅल येथे आयोजित केलेल्या गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभ बुधवार दि.७ आयोजित केला होता.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा परिषद आदर्श क.प्रा.शाळा येथे भेट देवून येथील डॉ.ए.पी जे.अब्दुल कलाम बाल वाचनालयाचे उद्घाटन केले.

त्यानंतर जगदंबा फंक्शन हाॅल मध्ये जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळा या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांचा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तडवळारत्न, तडवळाभूषण ,शिक्षक रत्न हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये केशव पवार मुख्याध्यापक कें.शाळा, रहेमान सय्यद मुख्याध्यापक क.शाळा, पांडुरंग वाघ मुख्याध्यापक गोपाळवाडी यांचा तडवळारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

तसेच ३६५ दिवस शाळा सुरू ठेवून वर्षभर ज्ञानदान करणारे तडवळा पॅटर्नचे जनक जगन्नाथ धायगुडे,शहाजी पुरी, बाळासाहेब जमाले यांचा तडवळाभूषण पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.दोन्ही शाळेतील २६ शिक्षकांचा शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये एस.पी.शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांनी गौरवोद्गार काढले. कोरोना काळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल कोविड योद्धा म्हणून डॉ. विलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,उपसरपंच सुरेश बापू पाटील, शहाजी वाघ, सरपंच मन्मथ आवटे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील वळेकर, गटशिक्षणाधिकारी संजीव बागल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...