आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:के.टी.पाटील मधील विद्यार्थ्यांचा सत्कार

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील के.टी.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.१ डिसेंबर २०२२ रोजी एड्सबाबत जनजागृती करण्यात आली. एड्स दिनानिमित्त खुल्या स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत श्रेया मठपती हिने रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

तसेच मयुरी पंचवाघ हिने चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. या दोघींचा सत्कार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. तसेच रेड रिबन क्लब अंतर्गत एड्स जनजागृती करण्यासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत साक्षी वट्टमवार व नुरी तहा यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. प्राचार्य डॉ. अमोल जोशी यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...