आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दिंडेगावच्या फिरोज शेखची बोरगावच्या प्रदीप काळेवर मात; त्रिकोळी येथे उरूसनिमित्त कुस्त्यांचा जंगी फड, अनेक ठिकाणच्या मल्लांसह हजारोंची उपस्थिती

उमरगा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील त्रिकोळी येथील शेख जिंदावली उरुसानिमित्त शनिवारी दि. ३० रोजी जंगी कुस्त्या पार पडल्या. अंतिम कुस्तीमध्ये दिंडेगाव, ता. तुळजापूर येथील मल्ल फिरोज शेखने बोरगावच्या प्रदीप काळेवर मात करीत शेवटची कुस्ती जिंकली. या वर्षी भरलेल्या शेख जिंदावलीची यात्रा मोठ्या उत्साहाने पार पडली.

त्रिकोळी येथील कुस्त्याला अनेक वर्षापासूनची परंपरा असून, या कुस्तीच्या फडात आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय मल्लानी हजेरी लावली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकमधीक शेकडो मल्ल या मैदानात दाखल होतात. येथील मैदान गाजवलेली अनेक मल्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली आहेत. रुस्तुम-ए - हिंद हरिश्चंद्र बिराजदार, महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख, राजाराम पैलवान, राष्ट्रीय कुस्तीपटू विष्णू बिराजदार, ज्ञानेश्वर गोचडे यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या मल्लांनी येथील कुस्ती आखाड्यात हजेरी लावली आहे.

दि. ३० रोजी शनिवारी पार पडलेल्या कुस्त्याला दुपारी चार वाजता प्रारंभ झाला. सुरुवातील लहान मल्लांच्या कुस्त्या घेण्यात आल्या. तद्नंतर जवळपास शंभर मोठ्या कुस्त्या पार पडल्या जवळपास अडीचशे पैलवानाने हजेरी लावली होती अंतिम कुस्ती भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांच्यातर्फे लावण्यात आली. यामध्ये दिंडेगाव, ता. तुळजापूर येथील मल्ल फिरोज शेख व बोरगाव (काळे) ता. लातूर येथील मल्ल प्रदीप काळे यांच्यात झाली. यामध्ये फिरोज शेख यांनी प्रदीप काळे याला चीतपट केले. दोन्ही पैलवान तोडीस तोड असल्याने अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मैदान रोखुन धरले. शेवटी फिरोज शेखने दुहेरी पट काढत बाजी मारली. विजयी पैलवानाची मिरवणूक काढण्यात आली. या कुस्तीची रक्कम भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांच्याकडून देण्यात आली. मुदगडवाडीचा पैलवान दत्ता भोसले व रोहित कुन्हाळे व आशिष कुन्हाळे यांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. यात्रेत पोलिस बंदोबस्तही होता.

दहावीच्या मुलांकडून जेवण व पाण्याची सोय
मुळज येथील सन १९९१ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी थंड पिण्याच्या पाण्याची व जेवणाची सोय केली होती.यात्रा कमिटीचे सदस्य पोलिसपाटिल विकास पाटील, हरी माडजे, महादेव भोसले, चेअरमन भीमराव पाटील, प्रवीण जाधव, शिवाजी सुरवसे, संजय मिरगाळे, अमर पाटील, दत्ता सुरवसे, अशोक कुन्हाळे, पप्पू काळे , शाहूराज हासूरे, भीमराव सुरवसे, ॲड. उद्धव भोसले , दत्तू मुदगडे , बळीराम मडोळे , विश्वनाथ कोडे , गुलाब भोसले , सुभाष पाटिल , हरीदास सुरवसे , विजयकुमार कांबळे, बाशूमिया मुल्ला , आदीनी परिश्रम घेतले .

बातम्या आणखी आहेत...