आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:माडज ग्रामीण प्रशालेतील विद्यार्थ्यांची क्षेत्र भेट ; शालेय शिक्षणासोबतच परिसराचा अभ्यास

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील माडज ग्रामीण प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नाईचाकूर येथील धवल क्रांती दूध संकलन केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व वसंतराव नाईक कृषी तंत्र महाविद्यालयास क्षेत्रभेट देवून शालेय शिक्षणासोबतच सर्व परिसर अभ्यासाची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना टेक्निकल विषयाचे चार भाग आहेत. अनेक उपक्रम मुलांना शिकता व जाणून घेता आले. खडकाळ सुपीक जमिनीवर कोणते पीक घेतले पाहिजे व फळबाग घेण्यासाठी माती प्रशिक्षण करून त्याचे योग्य संगोपन कसे केले पाहिजे, याची माहिती वसंतराव नाईक कृषी तंत्र महाविद्यालयात येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, आरोग्य सेविका अन कर्मचाऱ्यांनी विविध विभागात भेट देवून प्रात्यक्षिक करीत विद्यार्थ्यांना माहिती दिली. नाईचाकूर येथील धवल क्रांती दूध संकलन केंद्राला विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी धवल क्रांती दूध संकलन केंद्राचे मालक सतीश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक दिगंबर फुकटे, रामजी साळुंखे, दिनेश पाटील, विजय माने, मनीषा गायकवाड, तसेच शिक्षक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...