आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विभाग:पंधरा लाख तपासणी, सप्टेंबरमध्ये 171 कुष्ठरुग्ण

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १५ लाख नागरिकांची तपासणी करून आरोग्य विभागाने सप्टेंबरमध्ये तब्बल १७१ नवीन कुष्ठरुग्ण शोधून काढले आहेत. यासाठी विविध आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी तब्बल २०३ पथके तयार करण्यात आली होती. रुग्ण शोधल्यामुळे उपचारासाठी मोठी मदत होणार आहे.

जिल्ह्यात दि. १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तपासणी केलेल्या लोकसंख्येच्या ०.५ टक्के संशयित रुग्ण शोधणे अपेक्षित होते. तपासणी केलेल्या संशयितांमधून १७१ नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले आहेत. आणखी काही संशयितांची १० ऑक्टोबरपर्यंत तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे.

यामध्ये चांगली बाब म्हणजे १७१ पैकी १३२ (७७ टक्के) असांसर्गिक रुग्ण असून ३९ (२३ टक्के) सांसर्गिक रुग्ण आहेत. बाल रुग्णात फक्त ६ रुग्ण सापडले असून त्याचे प्रमाण ३.५ टक्के आहे. यावरून रोग प्रसाराची साखळी कमी होत आहे. नवीन रुग्ण लवकरात लवकर शोधून उपचारा खाली येत असल्याचे दिसून येते. मोहिमेमध्ये शोधलेल्या १७१ रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांची डिस्ट्रिक न्यूक्लियस पथकाने पडताळणी केली आहे. ऑगस्ट २०२२ पर्यंत जिल्ह्यातील दहा हजार लोकसंख्येतील क्रियाशील कुष्ठ रुग्णांचे प्रमाण १.३ इतके आहे.

शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सहाय्यक संचालक कुष्ठरोग,

७,९११ संशयितांना शोधले
जिल्ह्यात ०.५३ टक्के संशयित शोधले. संशयिताच्या तीन टक्के नवीन रुग्ण शोधणे अपेक्षित आहे. ७ हजार ९११ संशयित शोधले. १ ऑक्टोबरपर्यंत ६ हजार २९० संशयितांची तपासणी केली. अंगावर पांढरा चट्टा असणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करून नावे घेण्यात आली. अंतिम तपासणी झाल्यावरच कुष्ठरोग निश्चित होईल.

प्रसार रोखण्यासाठी गोळ्या, १४ ते २१ ऑक्टोबरला एक डोस
नवीन रुग्ण शोधण्याचे एक लाख लोकसंख्या मधील प्रमाण २४.७ इतके आहे. बाल रुग्णाचे प्रमाण २.४२ टक्के आहे. सांसर्गिक रुग्णाचे प्रमाण ३६.३६ टक्के आहे. विकृती रुग्णांचे प्रमाण ०.६ टक्के आहे. रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी इतर आजारांमध्ये लसीकरण करतात.परंतु कुष्ठरोगावर लस नसल्याने नवीन शोधलेल्या कुष्ठ रुग्णाच्या जवळच्या सहवासितांना आजार होऊ नये म्हणून गोळ्या दिल्या जातात. एक डोस दि. १४ ते २१ ऑक्टोबरला देण्यात येईल.

१५ लाखांची तपासणी
शोध माेहीम यशस्वी करण्यासाठी आशा आणि पुरुष स्वयंसेवक यांचे १२०३ पथके तयार करून घरोघर सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १५ लाख ३ हजार ७९५ इतक्या लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील शंभर टक्के आणि शहरी भागातील अति जोखमीचा भाग असलेल्या भागात ही तपासणी झाली.

बातम्या आणखी आहेत...