आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश:लहान मुलांना भिक्षेसाठी प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा

तुळजापुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिर परिसरात बाल भिक्षेकरी मुलाच्या माध्यमातून भीक मागणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून लहान मुलांना या चुकीच्या प्रवाहात प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी ओंबासे बोलत होते. या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महिला व बालकल्याण अधिकारी सुनील अंकुश, सामाजिक कार्यकर्ते संजय बोंदर, तहसीलदार सौदागर तांदळे, विशाखा समिती जिल्हाध्यक्ष बाबई चव्हाण, मंदिर संस्थानचे अभियंता अनिल चव्हाण, नगर परिषद अधीक्षक वैभव पाठक, कामगार अधिकारी जी. बी. काकडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, बाल कल्याण समिती अध्यक्ष विजयकुमार माने, महिला पोलिस उप निरीक्षक आर. पी. मंजुळे, गट शिक्षण अधिकारी एम. ई. माने आदींची उपस्थिती होती.

तीर्थक्षेत्र तुळजापुरातील भीक मागणाऱ्यांची वाढती संख्या पाहता यावर प्रशासकीय कार्यवाही व्हावी आणि बाल भिक्षेकरी यांना शैक्षणिक प्रवाहात आणले जावे, यासाठी समाजसेवक संजय बोंदर अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. दरम्यान पोलिस, मंदिर, नगर परिषद, महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची माहिती तहसीलदार सौदागर तांदळे यांनी यावेळी बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...