आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माहिती भरुन मतदानयंत्र सील

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रांवर उमेदवारांचे नाव व चिन्ह लाऊन, माहिती भरुन मतदानयंत्र सील करण्यात आले. मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या या प्रक्रियेत २१९ मतदानयंत्र व १६६ कंट्रोल युनिटमध्ये डाटा एंट्री करण्यात आला. दरम्यान, निवडणूक निरीक्षक अरविंद लोखंडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून नळदुर्ग रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्पोर्ट्स हाॅलमधील निवडणूक कार्यालयात मंगळवारी (दि. १३) मतदानयंत्र सील करण्यात आले. यावेळी मतदान यंत्रावर उमेदवारांचे नाव, चिन्ह लावण्यात आले. तसेच मतदान यंत्रात उमेदवारांची माहिती भरण्यात आली. एकूण २५ टेबलवर ही प्रक्रिया चालली. यावेळी प्रत्येक टेबलवर निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मास्टर ट्रेनर तसेच उमेदवारांची उपस्थिती होती. या प्रक्रियेत २१९ मतदान यंत्र व १६६ कंट्रोल युनिटमध्ये माहिती भरण्यात आली. यावेळी प्राधिकृत अधिकारी तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार अमित भारती, दत्ता नन्नवरे उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षकांची भेट निवडणूक निरीक्षक लातूरचे अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी भेट देऊन मतदान यंत्र सील करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी निवडणूक निरीक्षक लोखंडे यांनी निवडणूक विभागाचा कामांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...