आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेत अंतिम डेडलाइन; आता यानंतर मुदतवाढ नाही

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या २९ प्रकारातील सवलती अंतर्गत प्रवास करणाऱ्यांपैकी ज्येष्ठांना १ जूनपासून स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. येत्या आठवड्यात म्हणजेच ३१ मे रोजी स्मार्ट कार्ड काढून देण्याची मुदत अखेर संपली होती. मात्र या योजनेस अखेर ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग बांधव आणि विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ ३३ टक्क्यांपासून ते शंभर टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आता पर्यंत २९ प्रकाराच्या विविध योजनेतून हा लाभ जिल्ह्यातील आता पर्यंत ४२ हजार ५४८ जणांना मिळाला आहे. या सर्वांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहेत. या विविध प्रकारच्या योजनेतून स्मार्ट कार्डच्या मागणीसाठी ४९ हजार २४४ जणांनी अर्ज केले आहेत. यात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त, अधिस्वीकृतीधारक अशा विविध सवलत धारकांचा समावेश आहे. या सवलतीसाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

शेवटचा एक महिना उरला, संबंधीतांनी लाभ घ्यावा
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी लाभार्थींकडे शेवटचा एक महिना उरला आहे. यानंतर आता सवलत मिळणार नाही. तसेच आपल्याकडून ४० टक्के पासून ते शंभर टक्क्यांपर्यंत विविध क्षेत्रातील व्यक्तींना सवलत देण्यात येते. ज्यांचे स्मार्ट कार्ड बाकी, त्यांनी कार्ड बनवून घ्यावे.
पांडूरंग पाटील, आगार प्रमुख.

बातम्या आणखी आहेत...