आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली निवडणूक:तुळजापुरात नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, रचनेत बदल नाही; ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापणार

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकी साठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १० मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानंतर इच्छुक उमेदवार कामाला लागणार असल्याने ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशानुसार नगर पालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असून मंगळवार (दि. ०७) अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचने नंतर सार्वत्रिक निवडणुकी चा पुढिल टप्पा नगराध्यक्ष व प्रभाग आरक्षण सोडत आणि अंतिम मतदार यादी प्रकाशित करणे असणार आहे. या प्रक्रिये नंतर सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नगर पालिका निवडणुकी साठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचने अंतिम मूदतीत एकूण ०८ आक्षेप दाखल करण्यात आले होते. यामध्ये प्रभाग क्रमांक ०१, प्रभाग क्रमांक ०४, प्रभाग क्रमांक ०६ आणि प्रभाग क्रमांक १० चा रचनेवर आक्षेप घेण्यात आल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र सुनावणीत आक्षेपावर सबळ पुरावे सादर करण्यात असमर्थ ठरल्याने सर्व आक्षेप फेटाळले गेले.

विरोधी नगरसेवकांचा प्रभाव असलेले प्रभाग क्रमांक ०४ - मंकावती गल्ली, प्रभाग क्रमांक ०६ - भीम नगर - आराधवाडी, प्रभाग क्रमांक १० - मंगळवार पेठ व प्रभाग क्रमांक ११ लोहीया आदींची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत असलेल्या प्रभागाची ऐनवेळी मोडतोड करण्यात आल्याने इच्छुकांचा तयारी वर पाणी फेरले आहे.

प्रभाग क्रं. १० भौगोलिक दृष्ट्या किचकट
नव्याने तयार करण्यात आलेला प्रभाग क्रमांक १० भौगोलिक दृष्ट्या किचकट आहे. हा प्रभाग जवाहर गल्ली येथील मारूती मंदिर पासून प्रारंभ होत असून या मध्ये संपूर्ण मंगळवार पेठ, तुळजापूर खुर्द रोड वर नेताजी नगर पर्यंत तसेच रोचकरी हाॅस्पिटल, लातूर रोड वर एस टी डेपो च्या बाजूने लोहीया, अॅड. जगताप यांचा घरा पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, हर्ष लाॅज, हुतात्मा स्मारक असा विचित्र प्रभाग तयार करण्यात आला असून या प्रभागात उमेदवारांचा कस लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...