आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविशेष अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) दाखल केलेल्या खटल्याच्या एकाही सुनावणीसाठी शासकीय अभियोक्ता शरद जाधवर हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबाबत तातडीने कारवाईचे आदेश विधी व न्याय विभागाने दिले होते. त्यानुसार शुक्रवारी आनंदनगर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीतंर्गत गुन्हा दाखल झाला. धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील लहू रामा खंडागळे यांचा मुलगा विकास खंडागळे यास दि.५ मे २०१५ रोजी गावातील ९ जणांनी जातीवाचक शिवीगाळ करत दिवसात ३ वेळा मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या त्याच्या आई-वडील, आजी-आजोबा व नातेवाइकांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांनाही मारहाण केली.
तसेच त्याचे आजोबा रामा खंडागळे यांच्या घरात विकास यास लपवून ठेवले असता आरोपींनी ते घर पेटवून दिले. याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू होती. मात्र, त्या सुनावणीस जाधवर हे आरोपींसह संगनमत करून गैरहजर रहात होते. न्यायालयाने यावर ताशेरे ओढत जाधवर यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. पीडित व्यक्तीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर शरद जाधवर यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, जाधवर यांना अटक करण्यात येणार की अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करून त्यांना जामीन मिळण्यासाठी मदत केली जाणार, की अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत वाट बघणार, याकडे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.