आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पुरवठा:अखेर उस्मानाबादचा पाणीपुरवठा सुरळीत

उस्मानाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या उपसा केंद्रासह वीज पुरवठा करणाऱ्या केंद्रातही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे शहरात तीन दिवस निर्जळी होती. मात्र, याची दुरुस्ती करुन नगर परिषदेच्या वतीने शहरातील पाणी पुरवठा सुरु केला होता.

मात्र, त्यास सुरळीत होण्यास तीन दिवसांचा अवधी लागला असून आता काही भागात येणारे पाणी तीन दिवसाआड मिळत असल्याचे दिसून आले आहे. पाणी नसल्याने नागरिकांना खासगी टँकरने किंवा पाणी पुरवठा करणाऱ्यांवर अवलंबून रहावे लागत असल्याचे दिसून आले. शहराला पाणी पुरवठा होण्यासाठी नगर परिषदेने युद्धपातळीवर काम पूर्ण करुन शहरवासीयांचा पाणी पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...