आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निरोधक विटा:होमकुंडात बसवणार अग्निरोधक विटा; गुजरातमधून मागवल्या 1601 विटा

तुळजापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडामधल्या बाजूने अग्निरोधक विटा बसवण्यात येत आहेत. यासाठी गुजरातमधून १६०१ विशेष विटा मागवण्यात आल्या आहेत. सोलापूर येथील देवी भक्त शरद धावड यांच्या वतीने मोफत काम करण्यात येत आहे. दरम्यान, मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच होमकुंडातील विटकाम करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील होम कुंडातील मधल्या भागातील विटा खराब झाल्या आहेत. यामुळे आतील बाजूने भिंतीची पडझड झाली आहे. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या पुढाकारातून होमकुंडातील विटांच्या भिंतीचे बांधकाम करण्यात येत आहे. सोलापूर येथील भाविक शरद धावड मोफत तुळजाभवानीची सेवा करत आहेत. यासाठी खास अग्नी रोधक विटा मागवण्यात आल्या आहेत. होमकुंडा सोबतच गणेश ओवरीत शाकंभरी नवरात्र महोत्सवाचा छोट्या होमाचे बांधकाम करण्यात येत आहे. नवरात्र महोत्सवा पूर्वी बांधकाम पुर्ण करण्यात येणार असल्याचे धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम यांनी सांगितले आहे. ९ फुट खोली तसेच ६ फुट लांबी व ६ फुट रूंदी असलेल्या होमकुंडाच्या विट कामासाठी गुजरातमधून १६०१ विटा मागवण्यात आल्या आहेत. या विटा अग्नी रोधक असून एक विट ८० रुपयांना असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...