आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौघांविरूद्ध अदखलपात्र गुन्हा:आधी बायकोने पतीला धुतले; नंतर वडील, सासू-सासऱ्यांनी केली मारहाण

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून बायकोने नवऱ्याला बदडून काढले. सोबत सुनेला होणारा त्रास पाहून सासरेदेखील पुढे सरसावले. त्यांनी आणि विवाहितेच्या आई-वडिलांनीही त्यास चोप दिला. किनगावमधील या घटनेप्रकरणी यावल पोलिसांत चौघांविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

किनगाव येथील देविदास तायडे हा तरुण यावल पोलिस ठाण्यात आला. त्याने पत्नीने आपणास खूप मारहाण केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास कारण विचारले असता, तो ठोस उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतरच्या प्राथमिक माहितीत तो दारूच्या व्यसनातून पत्नी सरला तायडेला सतत मारहाण करत असे. शनिवारी पुन्हा पती-पत्नीत वाद झाला. चिडलेल्या बायकोने देविदासला धुतले. सासरे निंबा तायडे, विवाहितेचे वडील मारुती सावकारे व आई वत्सलाबाई (वाघळी ता. जामनेर) यांनीदेखील त्यास बदडून काढले. त्यामुळे त्याने घरातून पळ काढून थेट यावल पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...