आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राकडे साकडे:कौडगाव येथे तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्पासाठी फडणवीसांचा पाठपुरावा

उस्मानाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे १० हजार युवकांना रोजगाराची संधी निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कौडगाव एमआयडीसीतील तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांना सोमवारी केली आहे.तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्पाला आवश्यक जागा व इतर पायाभूत सुविधा कौडगावात आहेत. कृषी, सैन्य, अंतराळासह रस्ते बांधकाम, क्रीडा व ऑटोमोबाइल क्षेत्रात मोठी मागणी आहे. त्यामुळे राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशनची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कौडगाव औद्योगिक क्षेत्रात तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्प उभारण्याची विनंती तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे २०१९ मध्ये केली होती. महाजनादेश यात्रेदरम्यान उस्मानाबादेत तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्पाची घोषणा केली होती.

त्यानुसार केपीएमजी या संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक अहवाल देखील तयार केला होता. राज्यात युती सरकार सत्तेत आल्यापासून जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रलंबित विषय मार्गी लागत आहे. कौडगाव एमआयडीसीतील प्रस्तावित तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्प देखील मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी यावर काम करत केंद्रीय वस्त्रोद्योग सचिवांकडे गेल्या आठवड्यात प्रस्ताव पाठवला आहे. फडणवीस यांच्याकडे या अनुषंगाने पुन्हा मागणी केली. त्यांनीही राज्य सरकारच्या वतीने एमआयडीसीने केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचे सांगत हा प्रकल्प मंजूर करण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती गोयल यांना केली. जिल्ह्यातील युवकांसाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या व जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा हा प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी ताकदीने प्रयत्न चालू राहतील व लवकरच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गोयल यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.