आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगाच्या स्पर्धेत धावून स्वप्न साकार करायचे असतील तर प्रत्येकाने आपले आरोग्य उत्तम ठेवावे. शारीरिक अन् मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी धावल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी स्व. गणपतराव कथले आघाडीच्या वतीने आयोजित कळंबमध्ये मॅरेथॉन २०२३ च्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी केले.
स्व. गणपतराव कथले आघाडीच्या वतीने दरवर्षी कळंबमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास नगरपालिका शाळा क्रमांक एक येथून डॉ. प्रतापसिंह पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, संजय घुले, प्रताप मोरे, अतुल गायकवाड, अॅड. तानाजी चौधरी, डॉ. सचिन पवार, डॉ, गिरीष कुलकर्णी, बाळासाहेब कथले यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. त्यानंतर स्पर्धकांनी अहिल्याबाई होळकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, साहित्य रत्न अणाभाऊ साठे चौक, जिजाऊ चौक व धर्मवीर संभाजी महाराज चौक ते डिकसळ असे अंतर धावून पार केले. स्पर्धा संपल्यानंतर डिकसळ येथील केंब्रिज इंग्लिश स्कूलच्या मैदानात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
सदरील स्पर्धा ही पाच गटात घेण्यात आली होती. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेला राज्यभरातून क्रीडाप्रेमींचा प्रतिसाद मिळाला असून यावर्षी स्पर्धेत ३ हजार ५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. मॅरेथॉन स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र बिक्कड यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, सुशील बलदोटा, शाम जाधवर, राजेंद्र बिक्कड, विकास कदम, रमेश अंबिरकर, भाऊसाहेब शिंदे, अशोक फल्ले, यश सुराणा, ओंकार कुलकर्णी, दत्ता लांडगे, नवनाथ पुरी, धर्मराज पुरी, प्रकाश खामकर, युवराज शिंदे, रोहित किरवे यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी पोलिस प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यांनी जिंकली मॅरेथॉन स्पर्धा
वयोगट ६ ते १५ मुलांमध्ये सालुगडे विशाल कुशांबर, कपिल महेश्वर रामगावे, प्रतीक हनुमंत पौळ तर मुलींमध्ये संजना सोमनाथ आवाड, स्वाती उत्तरेश्वर वाघमारे, रुपाली लालासाहेब कुरुंद. वयोगट १६ ते ४५ पुरुषात मरकट किशोर विठ्ठल, (पाथर्डी,अ.नगर ), प्रतीक राजेंद्र जुळे (बीड), अमर महादेव कोल्हे. महिलांमध्ये वल्लवे पूनम अरुण, साळुंके योगिनी उमाकांत, सुरवसे राजनंदिनी शिवाजी. ४५ वर्षांपुढील नागरिकांत चव्हाण शाहजी नारायण, शिंदे भारत सोपान, जाधवर रामचंद्र विश्वनाथ यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.