आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिप हंगाम:पीकविम्यासाठी पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात ईट येथे रास्ता रोको

ईटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हक्काचा पीककिमा व अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील ईट येथील (ता. भूम) नागेवाडी चौकात शेतकऱ्यांची सोमवारी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. यामध्ये येथील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईट व परिसरात खरिप हंगामामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबिनसह अन्य पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. यामुळे शेतकरी संकटात सापडला. झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे आदेश देण्यात आले. मात्र, यातून ईट महसुल मंडळ वगळ्यात आले. मंडळातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. खरिपाच्या हक्काचा पिकविम्यापासूनही शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले. यामुळे येथील शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले.

शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. काही दिवसापूर्वी प्रशासनाला इशारा देवूनही तहसीलदार आंदोलनस्थळी उपस्थित राहिल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी अनुदान व पिकविमा न मिळल्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्याा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरपंच संजय असलकर, शेतकरी संघटनेचे अंनत डोके, प्रताप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संयाजी हुंबे, राजाभाऊ हुंबे, संदिपान कोकाटे, समाधान हाडूळे, संजय हुंबे, प्रसाद सातपुते, शंभुराजे देशमुख, अंनत पाटील, अशोक लहाणे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...