आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेचा बोजवारा:पाच-पाच दिवस घंटागाडी येत नसल्याने घाण साठून दुर्गंधी, नागरिकांची घुसमट

उस्मानाबाद / हरेंद्र केंदाळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील यशवंतनगर, हद्द वाढ भागांसह अन्य काही भागात पाच-पाच दिवस घंटागाडी फिरकत नसल्याने शहरात अनेक नागरिकांच्या घरात दुर्गंधी सुरु सुटत असल्याने त्यांचा कचरा रस्त्यावर यायला सुरुवात झाली. दुसरीकडे मोजक्याच नाल्या नियमित सफाई होत असून उर्वरित नाल्यांकडे महिने महिने दुर्लक्ष होत आहे. तुळजाभवानी व्यापारी संकुल समोर ड्रेनेजचे घाण पाणी मुख्य रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नगर पालिकेत नियोजनाचा अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. नवीन मुख्याधिकारी यातून सुटका करणार, असा विश्वास शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या ११ महिन्यापासून शहरात सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासक म्हणून मुख्याधिकाऱ्यांवर आली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्यंतरी निवडणुक आचार संहिता निवडणुकीचे कामेही करण्याची वेळ आली होती. तसेच आता नुकतीच त्यांची बदली झाली. त्यामुळे नियोजनाची कामे प्रलंबित राहिली. दुसरीकडे ज्या कनिष्ट अधिकाऱ्यांकडे या कामांची जबाबदारी आहे, त्यांना ती पार पाडता आली नसल्याने शहरात सद्या मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी नव्याने मुख्याधिकारी पदाचा पदभार सांभाळत असलेल्या वसुधा फड यांनी चांगलीच तयारी केली असून अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सद्या सत्र सुरु केले आहेत. त्यामुळे आगामी काळात शहराचे रुप पालटणार असून विकास कामांना अधिक वेग येणार असल्याचे संकेत पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून समाेर येत आहे.

शहर स्वच्छतेसाठी असे नियोजन करणे आवश्यक {तज्ञांच्या माहितीनुसार घंटागाडी सुरु करण्यापूर्वी त्याचा रोड मॅप आवश्यक. {त्यावर नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या भागातील वेळ व मॅपची माहिती असावी. {त्या वेळी, त्या भागात गाडी जाते किंवा नाही याच्या खात्रीसाठी जीपीएस असावे. {अनेकदा कनिष्ट अधिकाऱ्यांनी अधून मधून गाड्यांची प्रत्यक्ष खात्री त्या भागात जाऊन करावी. {तसेच कचरा घेतला जातो की किंवा नाही याचीही माहिती घ्यावी. {दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या समस्या व नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्या. {नाले सफाईसाठी प्रत्येक भागाची जबाबदारी संबंधीत कर्मचाऱ्यांवर सोपवावी. {जणेकरुन त्या भागात सफाई झाली नसल्यास कर्मचारी कोण लगेच कळेल. {शहरवासीयांना समस्या निवारणासाठी तक्रार नंबर हवा. {घंटागाड्यांचे नियमित जीपीएस ट्रॅकिंग तपासणी करावी. {रस्ते सफाईची संबंधीत पर्यवेक्षकांनी नियमित पाहणी करावी.

घंटागाड्यांवर नियंत्रण नाही घंटागाड्यांवर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे कोणत्या भागात कधी गाडी जाते तर कधी जात नाही. याची माहिती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडेही नसते. ऐन दिवाळीतही पाच-सहा दिवस घंटागाड्या काही भागात फिरकल्याच नव्हत्या. आताही तीच स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे स्वच्छता निरीक्षकांनी घंटागाडी नियमित येत असल्याचे स्पष्ट केले असले तरी, त्या भागात सहा दिवसांपासून घंटागाडीच आलेली नाही.

जीपीएस कोण बघते ‌? घंटागाडीवर ती कोणत्या भागात किती वाजता जाते, याची माहिती घेण्यासाठी जीपीएस लावले आहे. तशी माहिती कर्मचारी देतात. मात्र, त्याची माहिती कोण बघतं, कधी त्यांना ट्रॅक कशावर केले जाते, याची माहिती नपच्या काही अधिकाऱ्यांनाही सांगता आली नाही.

नियोजन बैठक लावली मी आत्ताच रुजू झाले असून विविध विभागांचा आढावा घेत आहेत. शहरात स्वच्छतेसाठी आढावा बैठक घेणार आहे. घंटागाडीच्या रोड मॅपसह नियोजन केले. नाले सफाई, अन्य विभागांच्या कामांचेही नियोजन सुरू आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे.-वसुधा फड, मुख्याधिकारी, नगरपरिषद.

बातम्या आणखी आहेत...