आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वातंत्र्यासाठी डॉ. हेडगेवारांनी कारावास भोगला

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतय स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे सक्रिय सहभागी होते. त्यामुळे त्यांना कारावास झाला होता. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी रा.स्व.संघ शाखांवर स्वयंसेवकांना कटिबद्ध होण्याचे आवाहन करण्यात येत होते,असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. रमेश पांडव यांनी केले.रूपामाता उद्योग समूहाच्या वतीने आयोजित श्री गणेशोत्सव व्याख्यानमालेत ते बाेलत हाेते.त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात रा.स्व.संघाचे योगदान, या विषयावर मत मांडले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, विधी प्रकोष्ठ राज्य संयोजक अ‍ॅड. मिलिंद पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. व्यंकटराव गुंड, सु.रा. पाटील,माजी नगरसेवक रमण धोत्रीकर,पत्रकार विजयकुमार पिसे, देविदास पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा.डॉ.पांडव म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे बालपणापासून सक्रिय होते. संघ स्थानपनेपूर्वीपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या असहकार आंदोलनासह अनेक आंदोलनात आणि कार्यक्रम, उपक्रमात सहभागी होते. त्यामुळे त्यांना अटक झाली होती, शिक्षाही झाली होती. १९२५ ला रा.स्व. संघाची स्थापना होण्यापूर्वी काही दिवस अगोदर डॉ. हेडगेवारांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणापासून फारकत घेवून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रखर राष्ट्रप्रेमी संघटन उभे करण्याचा चंग बांधला होता.

भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वी त्याग करून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन संघाच्या शाखांवर करण्यात येत होते. त्यामुळे अनेक संघ प्रचारक भारताच्या वेगवेगळ्या भागात जावून राष्ट्रभक्तीचा यज्ञ पेटवत होते. त्यात घराबाहेर पडून सर्व सुखांचा त्याग करून प्रचारक म्हणून जावून आयुष्याच्या समिधा अर्पण करत होते.स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयासाठी झटणाऱ्या संघ स्वयंसेवकांचे महात्मा गांधी, मोतीलाल नेहरूंनीही कौतुक केले होते.व्याख्यानमालेच्या उपक्रमाला शुभेच्छा देताना नितीन काळे यांनी कौतुक केले. रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. व्यंकट गुंड यांनीही या व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका मांडली.

कार्यक्रमामध्ये या मान्यवरांचा झाला सन्मान या कार्यक्रमात शहरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सु.रा.पाटील आणि माजी नगरसेवक रमण धोत्रीकर यांचा संयोजकांच्या वतीने सन्मानपत्र, शाल, बुके देवून विशेष सत्कार करण्यात आला. सु.रा. पाटील यांनी रा.स्व. संघ, पतंजली योग शिक्षक तसेच माध्यमिक शिक्षक म्हणून केलेल्या समाज सेवेच्या कार्याबद्दल सन्मान पत्राद्वारे उल्लेख करून त्यांच्या कार्य कर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच रमण धोत्रीकर यांनी रा.स्व. संघ विचारांच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेतून केलेले छात्र नेतृत्व, त्यानंतर भाजयुमोच्या माध्यमातून केलेले राजकीय नेतृत्व, त्यानंतर जनसंघाचे शहरातील पहिले नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक या कार्यकाळापासून ते करत असलेल्या सेवेबद्दल त्यांना सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला मसलेकर यांनी तर आभार देविदास पाठक यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...