आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळदुर्ग किल्ल्यास 40 हजार पर्यटकांनी दिली भेट:बारा वर्षांनंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात वाहतोय नळदुर्गचा नर-मादी धबधबा

नळदुर्ग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : लतीफ शेख, नळदुर्ग - Divya Marathi
छाया : लतीफ शेख, नळदुर्ग

या वर्षी सततच्या पावसाने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गजवळचे बोरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सांडव्याद्वारे बोरी नदीतून वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्याने खालच्या भागात असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महालातील नर-मादी धबधबा सुमारे १२ वर्षांनंतर या वर्षी प्रथमच ऑगस्ट महिन्यातच प्रवाही झाला आहे. गेल्या चार दिवसांतील सुट्यांमुळे महाराष्ट्रच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटकासह तेलंगणातील ४० हजार पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिली आहे. दरवर्षी हा धबधबा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात वाहू लागतो.

निर्बंध उठल्यामुळे गर्दी
२०२० व २०२१ मध्येही धबधबा सुरू होता. मात्र तेव्हा कोविडमुळे पर्यटकांसाठी किल्ला बंद होता. त्यामुळे व्यावसायिकांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. आता निर्बंध उठल्यानंतर किल्ला पुन्हा सुरू झाला असून गर्दीही होत आहे.

बातम्या आणखी आहेत...