आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशादर्शक:जगदाळवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच लागली महिलांची वर्णी

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण असल्याने राजकीय करिअरसाठी ग्रामीण भागात महिला पुढे येत आहेत. सहकार क्षेत्रात मात्र महिला केवळ नावापुरत्या असतात, मात्र जगदाळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेखा दिलीप मोरे तर उपाध्यक्षपदी अहिल्यादेवी बाजीराव जगदाळे यांची निवड करण्यात आली आहे. महिलांच्या हाती सहकारी संस्थेचा कारभार देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

ग्रामीण भागातील राजकारणात विविध सेवा सोसायटीच्या सहकारी संस्थेवर वर्चस्व निर्माण करण्याची इर्षा विविध पक्षांसह स्थानिक लोकांची असते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नाजूक झालेल्या आर्थिक स्थितीमुळे ग्रामीण भागात सेवा सहकारी संस्थेची अवस्थाही बिकट झाली आहे. संस्थेच्या आर्थिक उलाढालीला मर्यादा आल्या तरीही या संस्थेवरील वर्चस्वासाठी स्थानिक लोकांचे प्रयत्न सुरू असतात. २०२२ या वर्षात विविध सेवा संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागल्याने तालुक्यातील ६१ सेवा सहकारी संस्थांपैकी ५९ संस्थांच्या निवडणूका झाल्या.

त्यातील ५२ संस्था बिनविरोध झाल्या तर सात संस्थेच्या निवडणूका झाल्या. तालुक्यातील जगदाळवाडी सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डी. डी. चिवडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेखा मोरे, उपाध्यक्षपदी अहिल्याबाई जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार क्षेत्रात उस्मानाबाद जिल्ह्यात दोन महिलांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. निवडीनंतर मोरे, जगदाळे यांच्यासह संस्थेचे नूतन संचालक मोहन भगत, विश्वंभर जगदाळे, माणिकराव चव्हाण, दौलतराव मोरे, आनंद जगदाळे, धर्माजी जगदाळे, माधव जगदाळे, विठ्ठल खैरे यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थांचा व्यवहारावर पारदर्शक हवा
ग्रामीण भागातील अर्थकारणाला सहकारी संस्थांमुळे चालना मिळून विकास गती येऊन सुधारणा घडून येतात. त्यामुळे सेवा सहकारी संस्थांचा व्यवहार पारदर्शक हवा. सेवा संस्थेवर पुरुषांचे वर्चस्व असते. मात्र, जगदाळवाडीच्या ग्रामस्थांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष दोन्ही पदे महिलांच्या हाती देवून सन्मान केला आहे.-डी. डी. चिवडे, सहाय्यक सहकार अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...