आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:डोंज्यात कृषीपंपांच्या बिलाची सक्तीने वसुली, थकबाकीदारांवर टांगती तलवार

डोंजा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महावितरणविरुद्ध शेतकऱ्यांमधून संताप, कांद्यासह गव्हाचे पीक धोक्यात

परंडा तालुक्यातील डोंजा येथील शेतकऱ्यांकडून कृषीपंपांच्या वीजबिलाची सक्तीची वसुली सुरू करण्यात आली आहे. महावितरणने बिलाची भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करण्याच्या हालचाली सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. कोरोना महामारीमुळे डोंज्यातील शेतकरी वर्षभरापासून आर्थिक संकटात सापडला असतानाच, महावितरणकडून शेतकऱ्यांचे कनेक्शन बंद करण्यात येत असल्याने कांद्यासह गव्हाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वीज तोडणी तत्काळ थांबवण्याची मागणी शेतकरी समूह डोंजाचे अध्यक्ष ज्योतीराम घोगरे यांनी केली आहे.

कोरोना महामारीमुळे डोंज्यातील शेतकरी वर्षभरापासून आर्थिक संकटात सापडला असतानाच, महावितरणकडून शेतकऱ्यांचे कनेक्शन बंद करण्यात येत असल्याने कांद्यासह गव्हाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वीज तोडणी तत्काळ थांबवण्याची मागणी शेतकरी समूह डोंजाचे अध्यक्ष ज्योतीराम घोगरे यांनी केली आहे.

घोगरे यांनी म्हटले आहे की, मागील एक वर्षापासून कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेत आहे. अशाही कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना त्रास देण्यात येत आहे. सध्या महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची वीज जोडणी थकबाकीसाठी तोडण्यात येत आहे. त्यामुळे विहिरी व तलावात पाणी असतानाही केवळ विजेअभावी हातातोंडाशी आलेले कांदा व गव्हाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक संकटातील शेतकऱ्यांची महावितरणकडून चाललेली वीज कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवावी. अन्यथा शेतकरी समूहाच्या वतीने वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलनाचा इशारा जोतिराम घोगरे यांनी दिला आहे.

वीज तोडणी थांबवण्यासाठी शेतकरी समूहाचा आंदोलनाचा इशारा

तोंडी आदेशावरच वसुली सुरू
कृषीपंपाचा वीजपुरवठा थकबाकीमुळे तोडता येणार नाही. थकबाकी पाहिजे असल्यास १५ दिवस अगोदर संबंधित शेतकऱ्यांना नोटीस देणे बंधनकारक आहे, असा हायकोर्टाचा निकाल आहे. मात्र सध्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी फक्त वरिष्ठांच्या तोंडी आदेशावरुनच वसुली मोहीम सुरू केली आहे. - अमोल पाटील, सचिव, शेतकरी समूह, डोंजा.

वीज जोडणी तोडण्याचे आदेश नाहीत
तालुक्यातील कुठल्याही भागातील शेतकऱ्यांचा कृषीपंपाचा वीजपुरवठा थकीत वीजबिलासाठी खंडित करण्यात आलेला नाही. मात्र, थकबाकी भरण्यासाठी फक्त आवाहन करण्यात आले आहे. कृषीपंपाचे वीज कनेक्शन बंद करण्याबाबत शासनाकडून आदेश नाहीत. - नागेश गोंजारे, वायरमन, डोंजा.

बातम्या आणखी आहेत...