आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी दारू:मेंढपाळाकडे सापडली 61 हजारांची विदेशी दारू

नळदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे रस्त्याच्या कडेला पालात राहणाऱ्या मेंढपाळाकडे विदेशी कंपनीची ६१ हजार ४४० रुपयांची दारू सापडली. ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली.

नळदुर्ग पोलिस ठाण्याचे गस्तीवरील हवालदार लक्ष्मण शिंदे यांना टेलरनगर ते खानापूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फिरस्ती मेंढपाळाकडून बेकायदा दारू विक्री केली जात असल्याचे समजले. एपीआय सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनात हलवालदार विलास जाधव, लक्ष्मण शिंदे, गणपत मुळे यांनी तेथे छापा मारला. पोलिसांची चाहुल लागताच दारू विक्रेता महादेव मरगु करे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांना त्याच्या पालावर विदेशी दारूच्या ३८४ बाटल्या आढळल्या आहेत. याची किंमत ६१ हजार ४४० रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...