आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षवल्ली:वृक्षारोपणाची औपचारिकता, जतनाकडे दुर्लक्ष, ३ वर्षात पारा अर्धा अंश वाढला ; वृक्षांचीच छायाचित्रे दिसतात संकेत स्थळावर

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात वन विभागाचे ७ हजार ६१५ हेक्टर वनक्षेत्र असून त्यामध्ये पाच वर्षात एक कोटी ३ लाख ९३ हजार ३०१ रोपांची लागवड केली आहे. पैकी ९४ लाख ११ हजार ६६२ रोपे जिवंत असल्याची नोंद वन विभागाच्या दप्तरी आहे. मात्र, प्रत्यक्षात अर्धी रोपेही जिवंत नाहीत. लागवडीची औपचारिकता पूर्ण करणे हाच वन विभागाचा अजेंडा आहे. यामुळे दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत चालली असून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. परिणामी उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत असून २०१९ च्या तुलनेत २०२२ मध्ये अर्धा अंशाने उन्हाची तीव्रता वाढली आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्षारोपण अन् संवर्धन गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते. यातून दुष्काळावर मात करणे शक्य होऊन ग्लोबल वार्मिक टाळता येते. जिल्ह्यात वन विभागाचे ७ हजार ६१५.५० हेक्टर वनक्षेत्र असून त्यापैकी १ हजार ६८५ हेक्टरवर १ कोटी ३ लाख ९३ हजार ३०१ रोपांची लागवड केली असून ९४ लाख ११ हजार ६६२ रोपे जिवंत असल्याची नोंद वन विभागाच्या दप्तरी आहे. मात्र, प्रत्यक्षात अर्धी रोपेही जिवंत नाहीत. वृक्ष लागवड केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी केली जाते. शासनानेही वृक्षारोपण व संवर्धन वाढवण्यासाठी वृक्षारोपण केलेली जागा अक्षांश-रेखांशाच्या माध्यमातून निश्चित केली जाते. लागवड केलेल्या झाडाची वाढ फोटोसह महाफॉरेस्टच्या संकेत स्थळावर अपलोड केले जातात. एक वृक्ष वर्षभरात २२ किलोपेक्षा अधिक कार्बन घेते शोषून कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली आहे. यामुळे नागरिकांना आता जागतिक पर्यावरण दिनप्रसंगी वृक्ष लागवडीची आठवण होऊ लागली आहे. मारण झाड पर्यावरणासाठी महत्वाचे आहे. झाड वर्षाला २२ किलोपेक्षा जास्त कार्बन शोषून घेते. त्यामुळे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातूनच पर्यावरणाचा समतोल साधू शकतो. शिवाय झाडे लावतानाही पर्यावरणाचा समतोल साधतील अशी झाडे लावणे महत्वाचे असून जंगलात फळांची झाडे लावली तर वनातील प्राणी शहरी भागात स्थलांतर होण्याचे प्रमाण रोखले जाईल.

बातम्या आणखी आहेत...