आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष बदल:भाजपचे माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनी अखेर कमळ सोडून शनिवारी (दि.१८) मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, राहुल मोटे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिग्विजय शिंदे व त्यांच्यासह प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक मिळेल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. जिल्हाध्यक्ष बिराजदार यांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कृष्णेचे पाणी दुष्काळी जिल्ह्याला मिळण्यासाठी येणाऱ्या दीड महिन्यात वॉटर ग्रीडच्या कामाला सुरुवात होईल. दोन वर्षात कामे पूर्ण होवून जिल्ह्याला पाणी मुबलक प्रमाणात मिळेल, असे आश्वासन दिले. तालुक्यात कोरोनाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी व शहराध्यक्ष खाजा मुजावर यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुक्यातील राजेंद्र झांबरे, बबन आयनिले,गगन सरपे,धीरज कांबळे, एकोंडीचे सरपंच बाबासाहेब सोनकांबळे, दिलीप माने, विक्रम कुमावत, मिथुन पाटील, नागेश पाथरूट, मिलिंद कांबळे, डी. टी. कांबळे, आनंद पाटील, गोपाळ घोडके, संग्राम नागणे, नागेश घोडके, विनोद घोडके, अनिल चव्हाण, हनुमंत दंडगुले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...