आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री चाकूरकर यांच्या 81 वर्षीय चुलत भावाची आत्महत्या:चंद्रशेखर पाटील यांनी चाकूरकरांच्या घरातच स्वतःवर झाडली गोळी

लातूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर पाटील (८१) यांनी आत्महत्या केली. त्यांनी रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास लातूर येथील शिवराज पाटलांच्या देवघर या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मूत्रपिंडाच्या आजाराला कंटाळून त्यांनी टाेकाचे पाऊल उचलल्याची शंका व्यक्त हाेत आहे. त्यांच्याकडे बंदुकीचा परवानाही होता.

चंद्रशेखर पाटील यांचे लातूरमध्ये शिवराज पाटील यांच्या घराजवळच घर आहे. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणेच वृत्तपत्र वाचन व चहासाठी चाकूरकरांच्या घरी आले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आवाज ऐकून घरातील सदस्य धावत बाहेर आले. तिथे त्यांना चंद्रशेखर पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

अनेकांना ‘गुड बाय’चा मेसेज
चंद्रशेखर रविवारी सकाळी घराबाहेर पडले, तेव्हा त्यांनी स्वतःच्या मोबाइलमधील काही ओळखीच्या लोकांना गुड बाय असा टेक्स्ट मेसेज केला होता. त्यानंतर काही वेळाने त्यांनी व्हॉट्सअॅपवरही त्याचे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...