आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:बालाघाट  साहित्य संमेलनाचे उद््घाटक माजी मंत्री चव्हाण

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुसऱ्या बालाघाट मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित दुसरे बालाघाट मराठी साहित्य संमेलन शनिवारी (दि.१७ संपन्न होत आहे. प्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या साहित्य संमेलनाचा शुभारंभ उद्घाटन सत्राने होणार आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील तर संमेलनाच्या निमंत्रकपदी योगेश केदार यांनी निवड करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...