आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:18 कोटींच्या विकासकामांचे माजी खासदार प्रा. गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन

उमरगा2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शहरातील हद्दवाढ भागातील अंतर्गत रस्त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून शनिवारी (दि.१९) माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सातत्याने पाठपुरावा करून शहरातील हद्दवाढ भागातील विकासकामसाठी २० कोटीच्या निधीतून शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील दंडाचा रस्ता प्रभाग क्रमांक सात मध्ये इंद्रायणी नगर, श्रमजीवी कॉलेजच्या मागील भाग, गॅस एजन्सी बाजूचे रस्ते, प्रभाग क्रमांक ११ मध्ये राम नगर, जिजामाता शाळा परिसरातील रस्ते तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये मुकबधीर शाळा परिसरातील रस्ते करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्यांची कामे सुरू होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले. यावेळी माजी सभापती ज्येष्ठ शिवसेना नेते जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, बाजार समिती सभापती मोहियोद्दीन सुलतान, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, उमरगा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, बळीराम सुरवसे, माजी नगरसेवक सिद्रामप्पा चिंचोळे, पालिकेचे नगर अभियंता राजन वाघमारे, महावीर कोराळे, नाना मदनसुरे, बालाजी सुरवसे, अशोक इंगळे, संतोष सगर, बालाजी पाटील, संजय पवार, रत्नकांत सगर, बापू बिराजदार, सचिन जाधव, योगेश तपसाळे, शफी चौधरी, महिला आघाडी शहरप्रमुख मीनाक्षी दुबे, अशोक इंगळे, कैलास शिंदे, माजी नगरसेवक गोविंद घोडके, रमेश इंगळे, प्रवीण माने, सुधाकर पाटील, युवासेना शहरप्रमुख अमर शिंदे, संदीप चौगुले, अभयकुमार हिरास, प्रा. सतीश इंगळे, अनिल सगर, सचिन शिंदे, व्ही. एम. पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...