आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान कर्मचारी मारहाण प्रकरण:सेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड निर्दोष, दिल्ली न्यायालयाने ठरविले दोषमुक्‍त

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने उस्मानाबादचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना आरोपातून दोषमुक्त केले आहे. २०१७ मध्ये ही घटना विमान प्रवासादरम्यान घडली होती.

शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात यापूर्वी २२ फेब्रुवारीला दोन कलमांतून सुटका केली होती. प्रा. गायकवाड यांच्यावर कलम ३५५ नुसार खटला चालवला गेला. दोन कलमांतून यापूर्वी त्यांना दिलासा मिळाला होता. एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणानंतर प्रा. गायकवाड देशभर चर्चेत आले होते. त्यानंतर प्रा. गायकवाड यांच्यावर विमान प्रवासबंदी व त्यांनी केलेले वेशांतर सर्वत्र गाजले होते. मार्च २०१७ मध्ये बिझनेस क्लासचे तिकीट दिले नाही म्हणून खासदार प्रा. गायकवाड यांच्याकडून एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर दिल्ली न्यायालयात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे आणि पुरावे नष्ट करणे, खोटी माहिती देणे, या आरोपातून दिल्लीच्या कोर्टाने मुक्तता केली होती. कलम ३५५ नुसार सकृतदर्शनी दोषी दिसत असल्याचे मत नोंदवत याचा खटला चालू ठेवण्यात आला होता.

दोन दिवसांपूर्वी विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्या म्हणण्यानुसार, प्रथमदर्शनी माजी खासदार प्रा. गायकवाड यांच्याविरुद्ध न्यायालयात कलम ३५५ (व्यक्तीचा अपमान करण्याच्या हेतूने प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी शक्ती किंवा गंभीर चिथावणी दिल्याशिवाय) यानुसार गुन्हा दाखल केला होता. प्रा. गायकवाड यांच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत, अशी बाब वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने वरील आरोपातून प्रा. गायकवाड यांना दोषमुक्त केले.

बातम्या आणखी आहेत...