आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ऊस तोडणी कामगारांवर प्रतिष्ठानची आपुलकी;केदार मळा वासूद येथे कामगारांना ब्लँकेट दिले ब्लँकेट

सांगोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ऊस तोडणी मजुरांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने दरवर्षी ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी बीड जिल्ह्यातील गेवराई आणि धारूर या ठिकाणाहून केदार मळा वासूद येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस तोडणी मजुरांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शनी गल्ली येथे राहणाऱ्या चव्हाण कुटुंबीयांनाही ब्लँकेट देण्यात आले.

थंडीत ऊस तोडणीचे काम करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांची संख्या भरपूर आहे. कडाक्याच्या थंडीत काम करणारे मजूर सध्या सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्यांच्या पैकीच काही कुटुंबाला ब्लँकेट देऊन आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ‘मायेची ऊब देण्याचे काम करण्यात आले आहे.

याप्रसंगी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सहसचिव शरणप्पा हळ्ळीसागर, अरविंद केदार, महादेव दिवटे, हरिभाऊ जगताप, निलकंठ लिंगे, सुरेश चौगुले, दादा खडतरे, अभियंता विकास देशपांडे, संजय गव्हाणे, अशोक भोसले, संजय केदार आदींची उपस्थिती होती.

कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण
बीड जिल्ह्यातील गेवराई, धारुर तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर जिल्हा सोडून ऊस तोडणीच्या कामासाठी जातात. ऊसाचा हंगाम संपेपर्यंत हे मजूर घर-दार सोडून ऊस तोडणीसाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात. त्यांचा मुक्काम ऊस तोडणीच्या ठिकाणीच जंगलात असतो. ब्लँकेटमुळे त्यांचा थंडीपासून बचाव होईल.

बातम्या आणखी आहेत...